आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई | टोलच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच पेटलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टोलमाफीच्या विधानानंतर राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेतली. यानंतर मनसैनिक आक्रमक झाले. अशातच आता यामध्ये काँग्रेसने उडी घेत मोठी मागणी केली आहे.
“राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल वसुलीत झालेल्या भ्रष्टाचाराचीच कबुली दिली आहे. देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना समजा चारचाकी वाहनांना राज्यातील सगळ्या टोलनाक्यांवर टोल माफ झाला असेल, तर एवढी वर्षं राज्यभरातील लाखो खासगी चारचाकी वाहनचालक-मालक यांच्याकडून टोल घेतला जातो, तो नेमका कोणाच्या खिशात जातो? असं मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
ही बातमी पण वाचा : भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून हा तर…; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
दरम्यान, “दर दिवशी टोलच्या माध्यमातून जमा होत असलेली शेकडो कोटींची रक्कम कुठे जाते? एवढा टोल भरूनही राज्यातील रस्त्यांची अवस्था एवढी बिकट का, राज्यातील लोकांना रस्त्यांवर, राज्य महामार्गांवर अगदी पायाभूत सुविधादेखील उपलब्ध का नसतात, या प्रश्नांची उत्तरंच फडणवीस यांनी आपल्या कबुलीतून दिली आहेत. हा पैसा नेमका कुठे जातो, याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी आणि केंद्रातील ED प्रिय भाजप सरकारने महाराष्ट्रातल्या जनसामान्यांच्या हिताच्या या प्रश्नावर संबंधितांवर कठोर कारवाई करावी” अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! वंचित बहुजन आघाडी, इंडिया आघाडीसोबत जाण्यास तयार – प्रकाश आंबेडकर
अंधारे बाई, याद राखा, यापुढे राजसाहेबांच्या नातवाला काय बोललात तर…; मनसैनिकांचा इशारा
अंधारे बाई, याद राखा, यापुढे राजसाहेबांच्या नातवाला काय बोललात तर…; मनसैनिकांचा इशारा