“गाैतम अदानीनंतर आता, अनंत अंबानी, ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल, चर्चांना उधाण”

0
452

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांमागे प्रसिद्ध उद्योगपती गाैतम अदानी यांनी मातोश्रीवर जात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर आता प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबाणी यांनी आज ठाकरेंची भेट घेतली.

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी आज मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास 3 तास चर्चा झाली. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. मात्र भेटीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

मनसेच्या वतीने शिवाजी पार्क मैदानात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होते. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. त्याचवेळी रात्री 8.20 च्या सुमारास अनंत अंबानी ‘मातोश्री’वर दाखल झाले होते. त्यानंतर 11.30 च्या सुमारास ते तेथून बाहेर पडले. अनंत अंबानी आणि उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल तीन तास चर्चां झाली आहे. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार?; मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या…

मनसेसोबत युती करण्याबाबत शहाजीबापू पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

जयंत पाटलांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here