धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सादर केली ‘ही’ 3 नावं आणि 3 चिन्हं, म्हणाले…

0
259

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना कुणाची?, शिंदेंची की ठाकरेंची?, या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे समोरासमोर आहेत. अशातच शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वाची बातमी समोर आलीय.

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणुक आयोगाने गोठवले आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला दोघांनाही धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. दोन्ही गटाला ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला.

हे ही वाचा : शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानं राज ठाकरे दु:खी, पण…; मनसेची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांनी जनतेशी लाईव्ह संवाद साधत असतांना त्रिशूल, उगवता सूर्य, मशाल या तीन नावांची मागणी केली आहे. तर नावं मिळवण्यासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नावांसाठी तीन पर्याय दिले आहे.

40 डोक्यांच्या रावणाने हे सगळं केले असून यामागे कोण आहेत ? हे सर्वांना माहिती असून त्यांचा हेतु शिवसेना संपत नाही म्हणून त्यांनी शिवसेना फोडून साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून भाजप संपून जाईल; शिवसेनेच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

मनसेत पक्ष प्रवेशाचं वादळ; लातूरमध्ये विवध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मला मारण्याची सूपारी दिली होती, आता शिवसेनेचं प्रत्युत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here