आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. 1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली. या सभेत राज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.
ईद (3 मे) नंतर मशिदींवरचे भोंगे उतरले नाही तर 4 मे पासून बिना परवानगीचे भोंगे असलेल्या मशिदींसमोर दुप्पट आवाजात भोंगे लावून हनुमान चालिसा पठण झालेच पाहिजे, असा राज यांनी यावेळी सरकारला इशारा दिला. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर पोलिसांकडून मनसे नेत्यांची धरपकड सूरू झाली आहे. यावरून आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : भोंग्याच्या निर्णयावरून शिवसैनिकांचा राज ठाकरेंना पाठिंबा, म्हणाले…
राज्य घटनेनं सर्वांनाच धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे. अशावेळी कोणी हनुमान चालिसा म्हणत असेल तर त्याचा काय गुन्हा?, असा सवाल करत हे सरकार मुस्कटदाबी करत आहे, असा हल्लाबोल गुणरत्न सदावर्तेंनी यावेळी केला. कोर्टाच्या आदेशानुसार सदावर्ते भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन याठिकाणी आले होते. यावेळी ते प्रसारमाध्यामांशी बोलत होते.
दरम्यान, राज्य सरकार भोंग्याच्या आणि हनुमाना चालिसाच्या मुद्द्यावरून मुस्कटदाबी करत आहे. यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बोललं पाहिजे, असं मत गुणरत्न सदावर्ते यांनी मांडलं.
महत्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! अमरावतीच्या खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केलं दाखल”
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांनी…; देवेंद्र फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका