आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे आणि ट्राफिकबाबत एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता राज्यभरात चर्चा सुरु झालीय. मी रोज सामान्य स्त्री म्हणून घराबाहेर पडते. त्यावेळी मलाही ट्रॅफिक आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होतो. रस्त्यावर ट्रॅफिक आहे, खड्डे आहेत. ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. कारण आपण कुटुंबाला वेळ देत नाही, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
मला वाटतं कॉमेडी आपण टीव्हीसाठी ठेवू. राजकीय मंडळी म्हणून आपण जे समाजकारण करत असतो, तेच आपण करत राहू”, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : शिवसैनिकांकडून सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर संजय राऊतांकडून प्रतिक्रिया; म्हणाले…
आदित्यजी तुमची ‘दिशा’ चुकतीये, अमृता फडणवीस यांच्यावर टीका करण्यापेक्षा तुमच्या पेंग्विन प्रमाणे चुराडा झालेल्या जनतेच्या पैशांचा हिशोब द्या, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला. तसेच राठोड, राऊत, परब यांसारख्या पात्रांमुळे शिवसेना हास्यजत्रा बनलीये, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.
महत्वाच्या घडामोडी –
गानकोकिळेची स्वरयात्रा विसावली; भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन
“दारूच्या नशेत बंडाचा केंव्हा सय्यद बंडा झाला कळलेच नाही”
“गानकोकिळा लता मंगेशकरांची प्रकृती चिंताजनक, राज ठाकरे यांनी तातडीनं रूग्णालयात घेतली धाव”