कोरोनानंतर नाईट लाईफ पुन्हा सुरू करणार- आदित्य ठाकरे

0
213

मुंबई : कोरोनानंतर पुन्हा नाईट लाईफ सुरू करणार, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मिशन बिगेन सुरू केल्यानंतर हळूहळू आम्ही सर्व बाबी सुरू केल्या आहेत. ज्यामध्ये अद्याप कोणतीही बाब बंद करण्याची वेळ आली नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आम्ही एमटीडीसी आणि इतर हॉटेल व्यावसायिक यांच्यासोबत पार्टनरशीप करणार आहोत. आणि त्यातून उत्पन्नाचं साधन निर्माण करणार आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच मुंबईत विटेज कार म्युझियम सुरू करणार आहोत. वरळीत हे म्युझियम असेल असं सांगत मुंबई विद्यापीठाकडून राजाभाई टॉवरसाठी प्रस्ताव आल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य; म्हणाले…

संजय राऊतांना महाराष्ट्राच्या नावाने राजकारण करायला पाहिजे; निलेश राणेंची टीका

जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा…; अतुल भातखळकारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

शिवसेना म्हणजे बिनपेंद्याचा लोटा, भूमिका नसलेला पक्ष; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here