मुंबई : आज 30 डिसेंबर या दिवशी महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेचे 13 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेतील. यात आदित्य ठाकरे यांचाही समावेश केला गेला असल्याने त्यांना राज्यमंत्री की कॅबिनेट मंत्रिपद मिळणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
आज दुपारी 1 वाजता महाविकास आघाडीचा शपथविधी होणार आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे 36 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
शिवसेनेकडून दोन अपक्ष आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. यात अचलपूर मतदारसंघातील आमदार बच्चू कडू आणि शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा समावेश आहे.
महत्वाच्या घडामोडी-
-मिळालेल्या संधीचं सोनं करा, अजित पवारांना शरद पवारांचा मोलाचा सल्ला
-…म्हणून रायगड जिल्ह्यात शेती शिल्लक राहणार नाही- शरद पवार
-अमृता फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला, म्हणतात…
-सत्तांतर झालं असलं तरी शिवसेना आणि भाजपचं रक्त एक आहे- चंद्रकांत पाटील