Home महाराष्ट्र “युजीसी विरोधात आदित्य ठाकरेंनी घेतली सुप्रीम कोर्टात धाव”

“युजीसी विरोधात आदित्य ठाकरेंनी घेतली सुप्रीम कोर्टात धाव”

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. त्यामुळे राज्य सरकार अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहे. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाने सप्टेंबर पासून परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यावर शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आता याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेनं या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. युजीसीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्याची माहिती युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी दिली आहे.

राज्य सरकारन आधीच अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर, कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाहीत, असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, युजीसी आणि राज्य सरकार यांच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांसमोर संभ्रम निर्माण होत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, युजीसीने पत्राद्वारे राज्यातील सर्व विद्यापीठांना गाईडलाईन्स पाठवल्या आहेत. त्याबरोबरच,अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे निर्देशही युजीसीनं दिले आहेत, असंही ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाउन वाढवण्यासाठी अनुकूल?”

अखेर ठरलं! पंकजा मुंडेंची दिल्ली वारी पक्की; सोबतच ‘या’ नेत्यांनाही दिल्लीत संधी

“हे सरकार पडणार नाही; मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांनी आता मुंगेरीलाल के हसीन सपने पाहावीत”

अशा बलात्काऱ्यावर उपचार करू नका, वाचलाच तर… ; मनसे आक्रमक