मुंबई : यंदाच्या वर्षीची आयपीएलचा 13 वा हंगाम यूएईमध्ये खेळवले जाणार आहे. आयपीएलमध्ये कोणता संघ बाजी मारणार हे पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता लागलीये. यासाठी सर्वच टीम्स नेटाने सराव करत आहेत.
विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात वेगवान गोलंदाज आदित्य ठाकरे याची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी नावसाधर्म्य असलेला हा युवा क्रिकेटपटू आहे विदर्भाचा आहे.
बीसीसीआयने आयपीएलसाठी किती खेळाडूंना यूएईला न्यायचं यावर बंधन घातलेलंय. पण यूएईमध्ये फलंदाजांना अधिकाधिक सरावासाठी विविधता असलेले गोलंदाज आवश्यक आहेत. ही गरज ओळखून आरसीबी संघाने वेगवान गोलंदाज आदित्य ठाकरेची निवड केल्याची माहिती आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे हा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चांगली गोलंदाजी करत आहे. त्यामुळे त्याची वर्णी यावर्षी आरसीबीच्या टीममध्ये लागल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या घडामोडी-
…मग तुम्ही कुटुंबात कलह का निर्माण करत आहात?; संजय राऊतांचा सवाल
प्रामाणिक करदात्यांना मोदी सरकारचा मोठा दिलासा; उचललं ‘हे’ मोठं पाऊल
प्रामाणिक करदात्यांना मोदी सरकारचा मोठा दिलासा; उचललं ‘हे’ मोठं पाऊल
“एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं”