आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भत घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरुन सध्या शिवसेना (Shivsena) आणि मनसेत (MNS) शाब्दिक युद्ध सुरु आहे. अशातच शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मनसेला खोचक टोला लगावला आहे.
मनसेच्या भोंग्यांच्या भूमिकेविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली आसता या विषयावर मला फार टिप्पणी करायची नाही. पण मनसेने भोंगे लावल्यास त्यावरून देशातील वाढत्या महागाईबाबत जनतेला माहिती द्यावी, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : जळगावमध्ये भाजप आणि शिवसेना आमने-सामने
पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि अन्य गोष्टींची दरवाढ कशामुळे झाली, हे मनसेने भोंग्यांवरून सांगावे.साठ वर्षांपूर्वीची इतिहास न उगाळता गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये काय झाले, हे सांगावे, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते
दरम्यान, आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला मनसेचे नेते आता काय पलटवार करतात, हे पाहावे लागेल.
महत्वाच्या घडामोडी –
राज ठाकरे सातत्यानं आपली भूमिका बदलतात, त्यामुळे…; राज यांच्याविरोधात शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी”
सुळे घुसले की, किती दुखतं ते विचारुन घ्या एकदा; राष्ट्रवादीचं राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
“बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर फक्त आणि फक्त राज ठाकरे यांचंच नाव”