आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप अॅड जयश्री पाटील यांनी केला आहे.
जयश्री पाटील यांनी याविरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल केली आहे. ध्वजारोहणाच्या वेळी रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाला सॅल्यूट केला नाही, तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना नियमबाह्य पद्धतीनं रेड कार्पेटवर बोलविण्यात आल्याचा आरोप जयश्री पाटील यांनी आपल्या तक्रारीमध्ये केला आहे. या प्रकरणी लोकायुक्तांकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हे ही वाचा : ‘…अशा पुड्या सोडण्याची जयंत पाटील यांना सवयच’; चंद्रकांत पाटलांचा टोला
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देताना डोक्यावर गांधी टोपी घातली नाही. त्याबाबत माझा काहीच आक्षेप नाही. मात्र प्रजासत्ताक दिनी रेड कार्पेटवर ध्वजवंदन करणारे उपस्थित असतात, यावेळी न विसरता सलामी द्यायची असते. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्नींनी सलामी दिली नाही. त्यांना संविधान मान्य नाही का? असा सवाल जयश्री पाटील यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच यामुळे देशवासियांच्या भावना दुखावल्या असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जयश्री पाटील यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
“जळगावमध्ये गुलाबराव पाटील गिरीश महाजनांच्या घरी, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना उधाण”
टिपू सुलतान नावाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले….
लवकरच सांगली जिल्ह्यातील काही माजी आमदार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार; जयंत पटलांचं मोठं वक्तव्य