अभिनेत्री प्राजक्ता माळी, शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या घरी; मनसेत प्रवेश करणार?; राजकीय चर्चांना उधाण

0
603

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे  दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कमधील मैदानात  दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.

या दीपोत्सवाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केल्यानंतर आता सर्वसामान्य लोकही या दीपोत्सवात सामील होत आहेत. यावेळी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं देखील या दीपोत्सवात उपस्थिती लावली. तसंच इतकंच नव्हे, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान ‘शिवतीर्थ’ इथेही प्राजक्ता गेली होती.

हे ही वाचा : मनसे-भाजप महायुती होणार की नाही? गुलाबराव पाटील, म्हणाले…

दरम्यान, प्राजक्ताने शिवतीर्थवरचे काही फोटोज शेअर केले आहेत. यातला एक फोटो चांगलाच चर्चेत आहे. या फोटोत प्राजक्ता, राज ठाकरे यांच्या नातवाला खेळवताना दिसतेय. प्राजक्ताने फेसबुक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या” शिवाजी पार्क येथील “दीपोत्सवाच्या” निमित्ताने पदरात पडलेले काही खास क्षण… दीपोत्सवाच्या आमंत्रणासाठी, अतिशय प्रेमानं केलेल्या पाहूणचारासाठी खूप धन्यवाद.. “मा. श्री राजसाहेब ठाकरे” अमित ठाकरे” अतिशय गोड अशा “शर्मिला ताई” आणि अमेय खोपकर दीपोत्सव बघून इतकी भारावून गेले की फोटो काढायचे विसरले… त्यामुळे नेमके ते फोटोज् नाहीत.. असो पण.. किआन बरोबर फोटो काढला…(त्याला भेटायचच होतं… , असं प्राजक्ताने फोटोजमध्ये म्हटलं.

दरम्यान, प्राजक्ताच्या या पोस्टवर, चाहत्यांनी अनेक कमेंट्स दिल्या आहेत. प्राजू, मला तुम्हाला राजकारणात पाहण्याची इच्छा आहे. कृपया मनसेमध्ये सामील व्हा आणि राज साहेबांप्रमाणे मराठी लोकांसाठी आणि चित्रपटांच्या भल्यासाठी काम करा…तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणत एका चाहत्याने तिला मनसेत सामील होण्याचा सल्ला दिला आहे

महत्त्वाच्या  घडामोडी –

मोठी बातमी! रवी राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांची पोलिसात तक्रार, म्हणाले, राणा यांनी…

 माझ्या डोळ्यात सहसा पाणी येत नाही, पण आज…; राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले…

टीम इंडियाच्या दमदार ‘विराट’ विजयावर, पत्नी अनुष्का शर्माची भावूक प्रतिक्रिया, म्हणाली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here