अभिनेत्री माधुरी दिक्षीत धावली कामगारांच्या मदतीला

0
205

मुंबई : सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मजुर-कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणारे कामगार, तंत्रज्ञ, ज्युनियर कलाकार यांची मोठ्या प्रमाणात उपासमार होऊ लागली. या अशा कोरोनाच्या परिस्थितीत अभिनेत्री माधुरी दिक्षीत फिल्म इंडस्ट्रीतल्या कामगार आणि तंत्रज्ञांच्या मदतीला धावली आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी माधुरी दीक्षितचे मदतीसाठी आभार मानले आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने कामगार मजुरांसाठी मदतीचं आवाहन केलं होतं. त्यांच्या आवाहनला सकारात्मक प्रतिसाद देत अभिनेत्री माधुरी दीक्षितने महामंडळाला भरघोस मदत केली.

दरम्यान, सामाजिक तसंच राजकीय संस्था, अनेक उद्योगपती, विविध क्षेत्रांत काम करणारी मंडळी, राजकारणी मंडळी तसंच चित्रपटसृष्टीत काम करणारे अनेक कलाकार यांनी आपापल्या परीने मदत केली आहे. दरम्यान, माधुरीने यावेळी इतर कलावंतांना देखील चित्रपट महामंडळाला मदत करण्याचे आवाहन केलं.

महत्वाच्या घडामोडी –

राज्य सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारवर खापर फोडत आहे- देवेंद्र फडणवीस

…म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार का?; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

राजकारण करु नका हे नेमकं सांगताय कुणाला?; आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्याना खोचक टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here