“शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट भोवली; अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी”

0
347

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त फेसबुक पोस्ट केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर केतकीला पोलिसांनी चौकशीसाठी नवी मुंबईतून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता तिला अटक करण्यात आली आहे. यानंतर आज ठाणे कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली.

हे ही वाचा : महाराष्ट्र आणि शिवसेना कुणासमोर झुकणार नाही- संजय राऊत

या प्रकरणी केतकीला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली. आज न्यायालयात केतकीने तिची बाजू मांडण्यासाठी वकील न घेता स्वतःच युक्तिवाद केला.  केतकीला सकाळीच सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. तर, या आक्षेपार्ह पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली होती.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला, राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…

सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर आज तुम्ही…; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत; छगन भुजबळ संतापले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here