मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला. 1 मे पासून देशातील राज्यांमध्ये लसीकरण चालू झालं आहे. इंजेक्शनद्वारे ही लस दिली जाते.
लस घेताना काहींना अजूनही इंजेक्शनची भीती वाटते, त्यामुळे लस घेताना काहीजण खूप घाबरलेले दिसतात किंवा डॉक्टरांना त्रास देतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. असाच प्रकार मराठी अभिनेत्री हिना पांचाळ हिनं केला आहे. हिनाने लस घेतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावरून तिला ट्रोल करण्यात आलं आहे.
जेंव्हा डॉक्टर तिला कोरोनाची लस देतात तेव्हा ती घाबरलेली दिसत आहे. हिनाच्या या ड्रामामुळे सोशल मीडियावर ती ट्रोल झालेली पहायला मिळत आहे. ओव्हर अॅक्टिंग की दुकान, ओव्हर एक्टिंगचे 50 रु. कट, अशा कमेंट्स हिनाच्या पोस्टवर आल्या आहेत.
View this post on Instagram
महत्वाच्या घडामोडी –
“पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री गायब, देश रामभरोसे; अहंकार बाजूला ठेऊन महाराष्ट्र मॉडेल लागू करा”
“सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्याने काय माशा मारायच्या का?”
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत 3 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करा- चंद्रकांत पाटील
महाविकास आघाडी सरकारच्या मनात पाप, त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही- विनायक मेटे