अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

0
167

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे.

आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना खटल्याच्या फाइल्स सीबीआयकडे सोपवण्याचे आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी त्याचे पालन केले पाहिजे आणि मदत केली पाहिजे, असे खंडपीठाने म्हटले आहे.

दरम्यान, बिहार पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचे सांगत चौकशी सीबीआयला देण्याचे कोर्टाने मान्य केले. मुंबई पोलीस सक्षम असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारनेही हा तपास सीबीआयकडे सोपवण्यास विरोध दर्शवला होता.

महत्वाच्या घडामोडी-

माझ्यासाठी प्रार्थना करा- संजय दत्त

शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; म्हणाले…

… ही दादांची स्टाईल असून ती मली भावते- अजित पवारांच्या भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही, त्यांना कधी भेटलेही नाही- रिया चक्रवर्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here