मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं आहे. ते 67 वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील एच. एन. रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान,आज उपचारादरम्यान निधन झालं आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर सप्टेंबरमध्ये भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मेरा नाम जोकर या चित्रपटामध्ये त्यांनी अत्यंत छोटं पण महत्त्वपूर्ण काम केलं. त्यानंतर बॉबी, चांदणी, नगीना, दिवाना, प्रेमरोग, अमर अकबर अँथोनी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं.
महत्वाच्या घडामोडी-
इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- उद्धव ठाकरे
इरफान यांच्या निधनानंतर युवराज सिंगचं भावूक ट्विट
मुख्यमंत्र्यानी राजीनामा देऊन बांगड्यांच दुकान उघडलं पाहिजे- निलेश राणे
अभिनेता इरफान खानचं निधन; 54 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप