“अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण”

0
250

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली आहे. फेसबुक पोस्टद्वारे प्रशांत दामले यांनी त्यांच्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे.

मागच्या शनिवारी, मागच्या रविवारी चिंचवडचा प्रयोग झाला त्यावेळी मला कणकण जाणवत होती. त्यानंतर मी मुंबईत आल्यावर कोरोना टेस्ट केली असता त्यात मी काठावर पास झालो आहे. तसा काठावर पास मी शाळेपासूनच आहे. पण हा काठ जरा डेंजर आहे. त्यामुळे डॉक्टर म्हणाले काठावर जरी असला तरी 7 दिवस आयसोलेशनमध्ये जावं लागेल. तर मागच्या बुधवारपासून मी 7 दिवसांच्या आयसोलेशनमध्ये आहे. त्यामुळे झालंय काय उद्याचा दुपारचा बोरीवलीचा प्रयोग आणि परवा दुपारचा गडकरीचा प्रयोग दोन्ही प्रयोग मला करता येत नाहीत. मात्र सध्या मी ठणठणीत आहे. मात्र डॉक्टर म्हणतात की नाही, तुला 7 दिवस विश्रांती घ्यावीच लागेल. आणि सगळ्यात दिलासादायक, सर्वात आनंदाची गोष्ट माझे सर्व कोआर्टिस्ट, बॅकस्टेज आर्टिस्ट ठणठणीत आहेत. मलाच थोडा मी काठावर पास आहे, तर तो काठावरचा मी जरा परत येतो आणि परत आपण काम सुरू करू. मी काळजी घेतो, तुम्हीही काळजी घ्या, असं प्रशांत दामले यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“भाजपचा ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार?”

हवेत झेप घेत विराट कोहलीने घेतला अविश्वसनीय कॅच; पहा व्हिडीओ

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे- गोपीचंद पडळकर

शपथविधीनंतर स्वतःचे आमदार टिकवता आले नाही तो माणूस…; निलेश राणेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here