अभिनेता इरफान खानचं निधन; 54 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

0
170

मुंबई : दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानने बुधवारी बुधवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. colon infection मुळे त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र वयाच्या 54व्या वर्षी इरफानने जगाचा निरोप घेतला.

‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या.

दरम्यान, जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर तो भारतात परतला होता. लंडनमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये इरफान खान उपचारानंतर पुन्हा भारतात परतला होता.

महत्वाच्या घडामोडी-

देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारच्या कारभारावर टिका; म्हणाले…

“माझ्याकडे सगळी माहिती आहे, पण…”; किम जोंग यांच्या प्रकृतीवर डोनाल्ड ट्रम्प यांचा खुलासा

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीसाठी महाविकास आघाडीचे नेते आक्रमक; घेतली राज्यपालांची भेट

उत्तर प्रदेशातील साधू हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here