“राज ठाकरेंच्या आदेशानंतर आता कार्यकर्ते आक्रमक, राहुल गांधींच्या सभेआधी मनसैनिक लोकेशनवर”

0
372

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. मात्र या दौऱ्यात आज दुसऱ्यांदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून आता मनसे आक्रमक झाली आहे.

सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील मनसे सैनिकांनी शेगावला जावे, असे थेट आदेशच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिले आहेत. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे हे मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत शेगावला जाणार आहेत. संदीप देशपांडे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंवर टीका करताना, आमदार रवी राणांची जीभ घसरली, म्हणाले…

सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांना आम्ही चोख प्रत्युत्तर देणार. आमच्या अविनाशने मोठ्या, मोठ्या लोकांचे माज उतरवले आहेत, त्यामुळे त्याला देखील बरोबर घेऊन जात आहोत. पोलिसांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करणार, असा इशारा संदीप देशपांडे यांनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का; ‘या’ नेत्यासह अनेकांनी केला भाजपमध्ये प्रवेश

कोणत्याही चित्रपटात जर पाकिस्तानी कलाकार दिसल्यास…; मनसेचा बाॅलिवूडला धमकीवजा इशारा

बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती बरखास्त होणार?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here