Home पुणे कार्यकर्त्यांची धरपकड होते, अन् हे गॅलरीत ये जा करतात; अजित पवारांचा राज...

कार्यकर्त्यांची धरपकड होते, अन् हे गॅलरीत ये जा करतात; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. 1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा पार पडली. या सभेत राज पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. तसेच त्यानंतर मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सूरू केली आहे. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

आम्हाला महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवू द्यायचा नाही. मग कायदा मोडणारा कुठल्या पक्षाचा, कुणाचा समर्थक, सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचा असो हे आम्ही हे बघणार नाही. जो संविधानाने दिलेल्या नियमाचे उल्लंघन करत असेल, नियम मोडणार असेल तर आम्ही सहन करणार नाही, असं अजित पवार म्हणाले. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा : राज ठाकरेंनी नेहमी आपल्या भूमिका बदलल्या, त्यांच्या भोंग्याचा आता ठेंगा झाला- गुलाबराव पाटील

मी मागेही सांगितलं होतं की, बोलणारे बोलतात आणि ते आपल्या घरी राहतात. आपल्या गॅलरीमधून इकडे-तिकडे बघतात आणि जातात. मात्र, कार्यकर्त्यांना नोटीसा जाऊन त्यांच्यावर केसेस दाखल होतात आणि त्यांची धरपकड होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही लक्षात घ्यावे, असा टोला अजित पवारांनी राज ठाकरेंना लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेची मोठी खेळी; मनसेच्या ‘या’ मोठ्या नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या भाजप खासदाराला मनसेचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

डोंबिवली ग्रामीणमध्ये शिवसेनेचा मनसेला खिंडार; मनसेचे दोन नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार?