मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणे यांच्याविरूद्ध लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
राणे यांच्या कुटूंबातील काही सदस्यांनी कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी चाैकशी करून कारवाई करण्याचे पत्र केंद्र सरकारच्या गृह विभागानंच राज्य शासनास पाठवलं होतं. या प्रकरणाची सत्यता पडताळणी केल्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं. ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, डीएचएफएल कर्ज प्रकरणी पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नितेश राणे व नीलम राणे यांनी 65 कोटी रूपयांचं कर्ज थकविल्याची तक्रार पोलिसांकडे आली आहे. दिवाण हाैऊन्सिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीने ही तक्रार दिली आहे. 25 कोटींचे कर्ज घेतलेल्या आर्टलाईन प्राॅपर्टीज प्रा.लि. या कंपनीच्या नीलम राणे या सह अर्जदार होत्या.
महत्वाच्या घडामोडी –
“कोरोनाचं संकट लवकर दूर होऊ दे; मुख्यमंत्र्यांची गणरायाच्या चरणी प्रार्थना”
“मोदी देश विकण्यासाठी सत्तेत बसले आहेत, त्यामुळे 2024 ला काँग्रेस पूर्ण ताकदीने लढणार”
“गुलाबराव पाटील यांनी घेतली गिरीश महाजन यांची भेट, चर्चांना उधाण”