Home देश “हवाई वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक महिला पायलट भारतीय”

“हवाई वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक महिला पायलट भारतीय”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : देशात व्यवसायांच्या अनेक क्षेत्रांमध्ये लैंगिक असामनता असली, तरी हवी वाहतूक क्षेत्र मात्र त्याला अपवाद आहे. हवाई वाहतूक मंत्रालयाच्या नव्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वाधिक महिला पायलट या भारतीय हवाई उद्योगात कार्यरत आहेत.

हवाई वाहतूक खात्याचे राज्यमंत्री व्ही के सिंग यांनी राज्यभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की देशात एकूण 17,627 रजिस्टर पायलट आहेत, त्यात महिलांची संख्या 2764 इतकी आहे. म्हणजेच एकूण पायलटपैकी 15 टक्के संख्या ही महिलांची आहे.

हे ही वाचा : मुंबई महापालिकेत वंचित आघाडीची शिवसेना, काँग्रस सोबत होऊ शकते युती- प्रकाश आंबेडकर

मार्च 2021च्या आकडेवारीनुसार, भारतीय विमान कंपन्यांमध्ये 12.4 टक्के महिला पायलट होत्या. डिसेंबरपर्यंत या आकड्यात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार केला, तर महिला पायलटची एकूम संख्या ही एकूण आकडेवारीच्या केवळ 5 टक्के इतकीच आहे. अमिरेका, ऑस्ट्रेलियासह इतर पश्चिमी देशांच्या तुलनेत भारतीतल महिला पायलट्सची संख्या दुप्पट आहे.

देशांतर्गत हवाई उद्योगात 13.9 टक्के महिला

देशांतर्गत विमान कंपन्यांत सर्वाधिक महिला आहेत. त्यात रीजनल एअरलाईन्समध्ये 13.9 टक्के, लो कॉस्ट एअरलाईन्समध्ये 10.9 टक्के,  मुख्य एअरलाईन्समध्ये 12.3 टक्के तर कार्गो एअरलाईन्समध्ये 8.5 टक्के महिला आहेत.

विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही महिलांची आघाडी 

जागतिक पातळीचा विचार केला तर महिलांनी चांगंली कामगिरी केलेली आहे. जागतिक पातळीवर डॉक्टरकीच्या व्य़यवसायात 44 टक्के महिला आहेत. अंतराळवीरांत 33 टक्के महिला आहेत. 29 टक्के वैज्ञानिक, 21 टक्के इंजिनिअर्स आणि 5 टक्के महिला या पायलट आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

रोहित पवारांच्या खेळीचा भाजपाला झटका! कर्जतमध्ये राष्ट्रवादी बिनविरोध

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुराव घोलप महाविद्यालयात काव्यवाचन स्पर्धा

देवेंद्र फडणवीस शाळेत जात होते, तेंव्हा भाजपचे दोनच खासदार होते; नवाब मलिकांचा टोला