आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राजकारणात राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. येत्या मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होईल. आता सर्व काही ठीक होईल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. यावरुन शिवसेनेचे नेते आणि परिवहन
मंत्री अनिल परब यांनी नारायण राणेंवर निशाणा साधलाय.
हे ही वाचा : संप बेकायदेशीर ठरविल्यास एका दिवसाला 8 दिवसांचा पगार कापणार- अनिल परब
नारायण राणेंच्या म्हणण्यानुसार सरकार चालत नाही, तर संख्याबळावर चालतं. महाविकास आघाडी सरकारकडे पूर्ण संख्याबळ आहे. त्यामुळे ठाकरे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. नारायण राणे हे सध्या जयपूरच्या दौऱ्यावर आहेत. एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी राणे बोलत होते.
दरम्यान, ‘महाराष्ट्रात भाजपचे सरकार नसल्याने तिथली स्थिती अशी बनली आहे. पण मार्च महिन्यात भाजपचे सरकार येणार असून तिथे अपेक्षित बदल दिसतील.’ असा दावाही नारायण राणे यांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राणे म्हणाले, मार्चमध्ये भाजपची सत्ता येणार; नाना पटोले म्हणतात..
“शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीची धाड”
…तर भाजपने आमच्यासोबत मिळून राज्य करावं; संजय राऊतांची थेट ऑफर