ज्या व्यक्तीला स्वत:चा पक्ष उमेदवारीसाठी लायक समजत नाही, त्याच्याबद्दल…; शरद पवारांची बावनकुळेंवर बोचरी टीका

0
156

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बारामती : आम्ही बारामती जिंकणार असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वारंवार म्हणत असतात. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना लक्ष्य केलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाच्या उमेदवारी तिकिट देण्यायोग्य नाही. त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं काहीही कारण नाही. त्यांना भाजपनं तिकिट नाकारलं त्यामुळे त्यांच्याबाबत काही बोलू नये, अशी बोचरी टीका शरद पवार यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षण कधी लागू करणार? मंत्री शंभुराज देसाई यांचं मोठं वक्तव्यं, म्हणाले…

बारामतीचे नाव घेतल्याशिवाय बातमी होत नाही. म्हणूनच ते वारंवार बारामतीच नाव घेत आहेत. अखंड महाराष्ट्राला आणि देशाला बारामतीचे महत्त्व माहिती आहे. म्हणूनच ते वारंवार बारामतीचे नाव घेतात, असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार बोलत होते.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! शरद पवार-प्रकाश आंबेडकर यांची भेट, चर्चांना उधाण”

“माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात, एकावर शाई फेकली की दुसरा शर्ट घालतो, अन्…”

दिवाळीत पवार कूटूंब एकत्र येणार का?; सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here