सूरत : भारताकडून टेस्ट आणि वनडे मॅच खेळणाऱ्या कर्नाटकच्या अभिमन्यू मिथुनने एक वेगळाच विक्रम केला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत मिथुनने हरियाणाच्या 5 बॅट्समनना एकाच ओव्हरमध्ये आऊट केलं आहे.
मिथुनच्या या कामगिरीमुळे कर्नाटकने हरियाणाचा 8 विकेटने पराभव केला. केएल राहुलने 66 रनची खेळी केली. या विजयासोबतच कर्नाटकने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
अभिमन्यू मिथुनने शेवटच्या ओव्हरमध्ये 5 विकेट घेतल्या. त्याने पहिल्या बॉलला हिमांशू राणा, दुसऱ्या बॉलला राहुल तेवतिया, तिसऱ्या बॉलवर सुमीत कुमार, चौथ्या बॉलवर अमित मिश्राला आऊट केलं. ओव्हरचा पुढचा बॉल हा वाईड होता, यानंतर पाचव्या बॉलला एक रन गेली आणि सहाव्या बॉलला जयंत यादवची विकेट घेतली.
हरियाणाच्या टिमने पहिली बॅटिंग करताना 194/8 स्कोअर केला. हिमांशू राणाने 61 रन, चैतन्य विश्णोईने 55 आणि हर्षल पटेलने 34 रन केले. हरियाणाने शेवटच्या ओव्हरमध्ये 5 विकेट गमावल्या. कर्नाटकने फक्त 15 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 195 रन केल्या.