आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आज बोलताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
एक महिला 15 वर्षे देशात पंतप्रधान होती, पण महिलांचे दुःख दूर केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि पहिल्या 5 वर्षातच महिलांचं दुःख दूर केलं, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली. ते औरंगाबाद शहरातील गॅस पाइप लाइन कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
हे ही वाचा : आंतरराष्ट्रीय पातळीवर देशासाठी सुवर्णपदक मिळवलेल्या प्रणिता पवारवर उपासमारीची वेळ; राज ठाकरेंनी घेतले पालकत्व!
एक महिला देशात 11 वर्ष पंतप्रधान होती. पण महिलांचं दुःख तिनं समजून घेतलं नाही. फक्त चूल आणि मूल हेच महिलांचं काम आहे, असं त्यांना वाटत होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि घराघरातील चुलीसमोर बसलेल्या महिलांचं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी 100 रुपयात गॅस उपलब्ध करून दिला., असं दानवे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“कुछ मीठा हो जाये, सांगलीत जयंत पाटलांनी सदाभाऊ खोतांना भरवली कॅटबरी, चर्चांना उधाण”
“सोमय्यांना कोर्टाचा पहिला दणका; नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला”