राणेंसारख्या गद्दाराची सिंधुदुर्गात डाळ शिजणार नाही; शिवसेनेची टीका

0
694

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात राणेंसारख्या गद्दाराची डाळ शिजू देणार नाही, असं वक्तव्य शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ते कुडाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.

हिमंत असेल तर नारायण राणे यांनी पुन्हा एकदा वैभव नाईक यांच्याविरोधात उभे राहून दखवावे, पराभव झाल्याशिवाय राहाणार नाही. दोनदा नारायण राणेंच्या पोराचा पराभव झाला, एकदा त्यांचा झाला. सिंधुदुर्गात नारायण राणेंसारख्या गद्दारांची कधीचं डाळ शिजणार नाही हे जिल्ह्याने दाखवून दिल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : “तासाभारापूर्वीच संजय राऊत भेटले, त्यानंतर आता शरद पवार गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण”

आजच नव्हे तर भविष्यात कधीही नारायण राणे अंगावर आले तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. नारायण राणेंनी हिमंत असेल तर पुन्हा एकदा नाईक यांच्याविरोधात उभे राहावे, कुडाळ मालवणमधून निवडणूक लढवून दाखवावी. त्यांचे डिपॉझिट जप्त नाही केले तर शिवसेनेचे नाव सांगणर नाही, असंही विनायक राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल”

संजय राऊत शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर; भेटीचं कारण काय? चर्चांना उधाण

आता मी ढवळाढवळ करू का?; उदयनराजेंचा थेट राष्ट्रवादीसह विरोधकांना इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here