सिंधुदुर्ग : येत्या 19 ऑगस्टपासून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंची मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. नारायण राणे यात्रेची सुरूवात शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाच्या दर्शनाने करणार आहेत. यावर शिवसेना खासदार नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
नारायण राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. राणेंसारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी बेईमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा या घरफोड्याला शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊ देणार नाहीत, असं विनायक राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, राणे ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेविरोधात उभे राहतात, तिथे तिथे शिवसेनेचाच विजय होतो हा इतिहास आहे. राणेंचं पानिपत करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. राणे समोर असल्यावर ही ताकद आणखीनच वाढते. त्यामुळे भाजपने राणेंवर मुंबईच काय ठाणे महापालिका आणि इतर महापालिकेची जबाबदारी दिली तरी सर्वत्र शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असंही विनायक राऊतांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
आमचं तीन पक्षाचं सरकार ‘अमर,अकबर,अँथनी’ प्रमाणे हिट होणार; नाना पटोलेंचं दानवेंना प्रत्युत्तर
राज्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांची भावना केंद्रापर्यंत पोहचवणार- आदित्य ठाकरे
…पण राज्य सरकारने ओबीसी समाजाचे हात बांधले; चंद्रशेखर बावनकुळेंचे पवारांना प्रत्युत्तर
भारतीय वायुसेनेच्या विमानाने अफगाणिस्तानातून 120 भारतीय सुरक्षित परतले