सव्वा रुपया असो की सव्वा कोटी आत्मसन्मान महत्त्वाचा; संजय राऊतांचा टोला

0
319

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सव्वा रुपयाचा मानहानीचा दावा करणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी, असा टोला लगावला होता. आता त्यावर संजय राऊतांनी पलटवार केलाय.

“आत्मसन्मानाची गोष्ट असते, त्यामुळे किंमत काही असो तुमच्याकडे सव्वा रुपया, सव्वा कोटी, भरपूर पैसे असतील त्या पैशांवर आमचं घर चालणार नाही. तुम्ही जाणीवपूर्वक बदनाम करत आहात”, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, संजय राऊतांनी माझ्यावर सव्वा रुपयांची मानाहानी करणार असल्याचं मी ऐकलं आहे. ते माझे मित्रं आहेत. त्यामुळे त्यांना मी एकच सूचवेन. त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी. कारण राऊतांची मानहानी निश्चितच सव्वा रुपयांची नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत राहू नये”

“कोल्हापूरकरांनी पुन्हा म्हटलं, आमचं ठरलंय, सोमय्यांना एन्ट्री देणार नाहीच”

हसन मुश्रीफांची चिंता पुन्हा वाढण्याची शक्यता; ‘या’ तारखेला किरीट सोमय्या कोल्हापूरला जाणार

भाजपचा शिवसेनेला अणखी एक धक्का; मुंबईत अनेक शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here