आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी पुन्हा एकदा डोळा मारला. त्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि चिन्हावर दावा करणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “याबाबत तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला याबद्दल काहीच काळजी करण्याची गरज नाही. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर कोणत्याही निवडणुकीत एबी फॉर्म भरताना पक्षाचे नाव आणि चिन्ह द्यावे लागतं. तोपर्यंत या सर्व गोष्टींबाबत तुमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडलेला असेल. एवढं बोलून झाल्यानंतर अजित पवारांनी डोळा मारला. यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
ही बातमी पण वाचा : “अजित पवार गट नक्की अपात्र होणार; ‘या’ आमदाराचं मोठं विधान”
यापूर्वी अजितदादा विरोधी पक्षनेते असताना विधिमंडळात ते पत्रकारांशी बोलत होते, त्याचवेळी उद्धव ठाकरे आले होते, त्यावेळी पवारांनी डोळा मारला होता, दरम्यान आज पुन्हा पत्रकार परिषदेत अजित पवारांनी डोळा मारल्यामुळे त्यांच्या या कृतीची जोरदार चर्चा होत आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
कृषीमंत्रीपद गेल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांची पहिली प्रत्रिक्रिया; म्हणाले…
अजित पवारांकडे अर्थखातं दिल्यावर, एकनाथ खडसेंचा शिंदे गटाला टोला, म्हणाले…
“बंडानंतर पहिल्यांदाच अजित पवार, शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल, चर्चांना उधाण”