नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल होणार की गांधी कुटुंबातीलच अध्यक्ष राहणार हा वाद गेले काही दिवस चालला आहे. अशातच गांधी कुटुंबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्ष होऊ शकते, असं वक्तव्य गांधी घराण्याचे निकटवर्तीय खासदार अहमद पटेल यांनी केलं आहे.
सोनिया गांधी यांच्या मदतीसाठी एक व्यवस्था तयार केली जात आहे. पण कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली की निवडणूक होऊन ज्या नेत्याला अधिक मतं मिळतील, त्या नेत्याला काँग्रेस अध्यक्षपदाची संधी मिळेल, असं अहमद पटेल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, तूर्तास तरी सोनिया गांधीच हंगामी अध्यक्षपदी राहतील, हे नक्की झालं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“काँग्रेसच्या नाराज आमदारांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा”
“विविध मागण्यांसाठी नर्सेसचं राज्यव्यापी दोन तास कामबंद आंदोलन”
रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण