मुंबई : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचं कोरोनावरील उपचारादरम्यान पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात निधन झालं. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती, असं शरद पवार म्हणाले.
गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!, असं म्हणत शरद पवारांनी राजीव सातव यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 16, 2021
महत्वाच्या घडामोडी –
राजकारणातला देवमाणूस गेला; राजीव सातव यांच्या निधनाने वडेट्टीवार यांना अश्रू अनावर
काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन; पुण्यात सुरू होते उपचार
सांगली जिल्ह्यातील लाॅकडाऊन वाढला; पालकमंत्री जयंत पाटील यांची घोषणा