मुंबई : देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. मंदीच्या लाटेने सगळेच गटांगळ्या खातील अशी स्थिती आहे. अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहेच., असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
किमान पंतप्रधान मोदी यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून प्रे. रुझवेल्टच्या भूमिकेत शिरणे महत्त्वाचे आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. संदय राऊतांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातील रोखठोक या सदरातून मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राष्ट्रीय उत्पन्न दोन तृतीयांशने खाली आले आहे, पण आपले राज्यकर्ते मात्र उदासीन आणि आत्मसंतुष्ट आहेत. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. अशा संकटसमयी एखादा नवा मनमोहन सिंग निर्माण करून त्याच्या हाती देशाची अर्थव्यवस्था सोपवणे गरजेचे आहे, असं मत संजय राऊत यांनी सामनातून व्यक्त केलं.
दरम्यान, मंदीतून सावरण्यासाठी अर्थव्यवस्थेस उभारणी देण्यासाठी आपण नक्की काय करीत आहोत यावर देशाचे पंतप्रधान व अर्थमंत्री काहीच बोलायला तयार नाहीत. प. बंगालमधील निवडणुकीत ममता बॅनर्जी नक्कीच हरतील, असे मोदी सांगतात. महाराष्ट्राचे सरकार आपल्याच ओझ्याने कोसळेल, असं अमित शहा म्हणतात. हासुद्धा मंदी व बेरोजगारीच्या प्रश्नावरचा उतारा नाही. देशाच्या अर्थमंत्री तर कुठेच दिसत नाहीत, असंही राऊतांनी सामनातून म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
मॉरिस चमकला; राजस्थानचा कोलकाता विरुद्ध 6 विकेट्सने विजय
अनिल देशमुखांच्या घरावर सीबीआयच्या छाप्यानंतर रुपाली चाकणकरांचं ट्विट; म्हणाल्या…
“अमित राज ठाकरे यांना रूग्णालयातून डिस्चार्ज”