मुंबई : भाजपमध्ये काम केलेला माणूस इतर पक्षात रमतच नाही, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा एकदा भाजपचा झेंडा हाती घेतला. यानंतर चंद्रकांत पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.
आज माजी आमदार श्री. बाळासाहेब सानप जी यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. देशाचा आणि राज्याचा विकास केवळ भाजपा करू शकतो, असा विश्वास बाळगून बाळासाहेब जी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज पक्ष प्रवेश केला आहे., असं चंद्रकांत पाटलांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.
आज माजी आमदार श्री. बाळासाहेब सानप जी यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. देशाचा आणि राज्याचा विकास केवळ भाजपा करू शकतो, असा विश्वास बाळगून बाळासाहेब जी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज पक्ष प्रवेश केला आहे. pic.twitter.com/qzGycsrUsF
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 21, 2020
दरम्यान, विरोधकांकडून होणाऱ्या ट्रोलिंगला आपण घाबरत नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पाटलांना सोशल माध्यमांवर ‘चंपा’ नावाने चिडवलं जातं. मात्र पाटलांनी आपण ट्रोलिंगला घाबरत नसल्याचं सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी-
“असा तत्पर चौकीदार मिळायला नशीब लागतं”
“इचलकरंजीत इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा मोर्चा; मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाजी”
…त्यांना रामवर्गणीचे महत्त्व आणि ममत्व काय असणार?; भातखळकरांची शिवसेनेवर टीका
महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा- देवेंद्र फडणवीस