वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
177

मुंबई : वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या दोन माजी आमदारांनी राजीनामा दिला असून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओक या बंगल्यावर दोघांनीही राष्ट्रवादीत प्रवेश घेवून अकोला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश घेतला आहे. यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, या दोन माजी आमदारांनी वंचित सोडण्याचं कारण पक्षांतर्गत असलेले मतभेद कारणीभूत असल्याचे म्हटलं जात आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्रावर विठू माऊलींचे आशीर्वाद आणि मुंबा देवीची कृपा, म्हणून निसर्ग चक्रीवादळाचं संकट टळलं

‘महाराष्ट्रा काळजी घे’ ; मनसेचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

आम्ही तुमच्या पाठिशी आहोत; अरविंद केजरीवालांचं उद्धव ठाकरेंना टि्वट

अर्शद वारसीने केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक; म्हणाला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here