आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : देशभरात आतापासूनच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा उमेदवारीवर आक्षेप घेतला जात आहे.
कल्याणमध्ये भाजपाच्याच मर्जीच्या उमेदवाराला तिकीट मिळेल, अशी ठाम भूमिका स्थानिक भाजपानं घेतली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा कार्यकर्ते सांगतील तोच उमेदवार मान्य केला जाईल. अन्य कोणता उमेदवार सहन केला जाणार नाही, अशी भूमिका भाजपाच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आली आहे. यावरून आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : धमकी प्रकरणावर आता खुद्द, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मी हे वाक्य ऐकलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं. मला वाटतं कल्याण लोकसभेचा उमेदवार कोण असेल याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतला जाईल. जो उमेदवार योग्य असेल त्याला उमेदवारी दिली जाईल. भाजपा-शिवसेनेची युती झाली ती वेगळ्या विचारांवर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका विचाराने ही युती केली आणि मग सरकार स्थापन केलं., असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
कल्याण लोकसभेतील मतदारांनी मला बहुमताने निवडून दिलं आहे. सगळं काम चांगलं सुरू असताना कोणीही क्षुल्लक कारणावरून युतीमुध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. सगळ्यांनी युतीसाठी काम केलं पाहिजे. 2024 मध्ये पुन्हा एकदा मोदीजी, पंतप्रधान होतील यासाठी काम केलं पाहिजे., असं आवाहन श्रीकांत शिंदेंनी यावेळी केलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
निलेश राणेंची शरद पवारांवर टीका; भाजपाच्या ‘या’ नेत्याकडून घरचा आहेर
“मोठी बातमी! रात्री 11 नंतर छत्रपती संभाजीनगर, बंद म्हणजे, बंदच; काय आहे कारण?”