मुंबई : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात महापूरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकार तातडीने मदत करणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
राज्य सरकारने पूरग्रस्तांना तातडीने 10 हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दरडग्रस्तांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
केंद्र सरकार मदत जाहीर करणार तोपर्यंत महाराष्ट्र सरकार वाट बघणार. १० हजाराची तातडीची मदत वडेट्टीवारांनी जाहीर केली होती ती अधिकाऱ्यांना माहितीच नाही. ठाकरे सरकारला चारी बाजूंनी ठोकलं पाहिजे, इतकं खोटं बोलणार आणि नालायक सरकार जगाच्या नकाशावर नसेल. एक दमडी दिली नाही पूरग्रस्तांना., असा घणाघात निलेश राणेंनी यावेळी केला.
केंद्र सरकार मदत जाहीर करणार तोपर्यंत महाराष्ट्र सरकार वाट बघणार. १० हजाराची तातडीची मदत वडेट्टीवारांनी जाहीर केली होती ती अधिकाऱ्यांना माहितीच नाही. ठाकरे सरकारला चारी बाजूंनी ठोकलं पाहिजे, इतकं खोटं बोलणार आणि नालायक सरकार जगाच्या नकाशावर नसेल. एक दमडी दिली नाही पूरग्रस्तांना.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 27, 2021
महत्वाच्या घडामोडी –
पर्यटन दौरा संबोधून लोकशाहीची थट्टा करणे योग्य नाही- प्रविण दरेकर
जनतेच्या आक्रोशामुळे शिवसेना हादरुन गेली, त्यामुळेच…; नारायण राणेंचा हल्लाबोल
शरद पवार म्हणाले दौरे टाळा; अतुल भातखळकर, म्हणतात…