आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
गोंदिया : राष्ट्रवादी पक्षाने गोंदिया जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून काही काळच लोटला असताना पक्षांतर्गतच्या राजकारणाला कंटाळून जिल्हाध्यक्ष विजय महादेवराव शिवणकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राकांपाच्या प्रदेशाध्यक्षांना पाठविला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा : राज्यातील तीन पक्षाच्या सरकारलाही आमचा धाक- चंद्रकांत पाटील
विजय महादेवराव शिवणकर यांनी राजीनामा पत्रात पक्षाशी नाराज असल्याचं म्हटलं आहे. विजय शिवणकर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या आलबेल नसल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे शिवणकर यांचा राजीनामा राष्ट्रवादीला मोठा धक्का असणार आहे.
दरम्यान, विजय शिवणकर आज भाजप पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपासून विजय शिवणकर पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
उल्हासनगरमध्ये चौकाचौकात झळकणार राष्ट्रवादीचे चमकणारे घड्याळ
सत्तेचा माज चढला असेल तर सरकारमधून बाहेर पडा; राष्ट्रवादीचा काँग्रेसला इशारा
कंगणानं केलेलं वक्तव्य जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीनं केलं असतं तर…; ओवैसी कडाडले