आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : दादरा नगर-हवेलीच्या रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुक पार पडली. या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी भाजप उमेदवाराला पराभवाची धूळ चारत दणदणीत विजय मिळवला. नेते आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली होती.
आदित्य यांनी दादरा नगर हवेलीत सभा घेत डेलकरांच्या विजयाला मोठा हातभार लावला. त्यामुळे बाळासाहेबांचे दादरा नगर हवेली जिंकण्याचे स्वप्न त्यांचा नातू आदित्य यांनी पूर्ण करुन दाखवलं.
हे ही वाचा : देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचा भाजपाला धक्का; काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही 1999 मध्ये दादरा नगर हवेलीत शिवसेना उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली होती. पण त्यावेळी बाळासाहेबांना यश मिळाले नव्हते. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार उत्तम पटेल यांच्या प्रचारासाठी त्यांनी सिल्वासामध्ये सभा घेतली होती. मात्र, त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यानंतरही शिवसेनेने अनेक निवडणुका दादरा नगर हवेलीमध्ये लढल्या. त्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, महाराष्ट्राबाहेर झालेली बाळासाहेबांची ती एकमेव सभा होती. यात मोहन डेलकर यांच्यावर बाळासाहेबांनी टीकाही केली होती. त्या टिकेचा दाखला भाजपने आताच्या पोटनिवडणुकीतही दिला होता. मात्र त्याच लाभ झाला नाही.
महत्वाच्या घडामोडी –
“दादरा नगर हवेलीवर शिवसेनेचा भगवा फडकला; कलाबेन डेलकर यांचा 50 हजार मतांनी विजय”
फटाके जरूर फोडा, पण धूर काढू नका; बारामतीत मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
“देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक! काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 10 हजार मतांनी आघाडीवर”