मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत आज फोनवर चर्चा झाली. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत भाजप राज्य सरकारसोबत आहे. या संकटसमयी आम्ही सारे सोबत आहोत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारला या समस्येला सामोरे जाण्यासाठी जे काही कठोर निर्णय घ्यावेसे वाटत असतील, ते त्यांनी जरूर घ्यावे. आम्ही भाजपा आणि विरोधी पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, रेशन धान्यासंदर्भात नागरिकांच्या समस्या आणि कामगारांचे प्रश्न याबाबत त्यांना अवगत केल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांच्याशी आज दूरध्वनीवर चर्चा केली आणि कोरोनाविरुद्धच्या या लढाईत भाजपा राज्य सरकारसोबत आहे, हे आश्र्वस्त केले. या संकटसमयी आम्ही सारे सोबत आहोत. @CMOMaharashtra #IndiaFightsCorona
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 2, 2020
महत्वाच्या घडामोडी-
शिधापत्रिका नसली तरी मोफत धान्य दिलं जावं; देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारला विनंती
“बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची खैर केली जाणार नाही”
मरकजमधील व्यक्तींनी पुढे येऊन तपासणीसाठी सहकार्य करावं- उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या 335 वर; मुंबईत 14 रुग्ण तर बुलढाण्यात 1 रुग्ण