आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बारामती : अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या इनक्युबेशन, इनोव्हेशन अँड सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या उदघाटनाच्या निमित्ताने उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे महत्वाचे नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
हे ही वाचा : नवाब मलिकांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; पंकजा मुंडे म्हणल्या…
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उद्या बारामतीत येत असल्याने शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. बारामती विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे सकाळी साडेनऊ वाजता आगमन होणार आहे. ते सव्वादहाच्या सुमारास ते ट्रस्टने उभारलेल्या डेअरी फार्मवर पोहचतील. तेथील पाहणी करुन मुख्यमंत्री कृषी महाविद्यालयानजिक उभारलेल्या इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरक़डे येतील. तेथील उदघाटन मुख्यमंत्री व प्रसिध्द उद्योगपती बाबा कल्याणी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या संस्थेची पाहणी करुन अप्पासाहेब पवार सभागृहात मुख्य सोहळा होणार आहे.
दरम्यान, या कार्यक्रमानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी मुख्यमंत्री भोजन करणार असून ते पुन्हा माळेगाववरुन बारामती विमानतळावर येऊन विमानाने दुपारी अडीचच्या सुमारास मुंबईकडे रवाना होणार आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“..म्हणून मी ईडीच्या चौकशीला सामोरे जातोय”
येत्या दोन वर्षांत शिवसेनेतील अनेक जण आमच्याकडे येतील; नारायण राणेंचा दावा
एमआयएमचा बडा नेताराष्ट्रवादीच्या वाटेवर? ऑडिओ क्लिप व्हायरल; चर्चांना उधान