आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी खुल्ताबाद येथे बैठक घेतली होती. या बैठकीत राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना गटबाजी बंद करण्याची समज दिली होती. मात्र ओवेसी परत जात नाहीत तोच एमआयएममध्ये फूट पडणार, डॉ. गफ्फार कादरी पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात दोन कार्यकर्ते आपापसात कादरी यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाबद्दल बोलत आहेत. कादरी हे पक्षात प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादीत जाणार असल्याचे ते बोलत आहेत. आपापसात चर्चा करणारे हे कार्यकर्ते कादरी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतल्याचे सांगत आहेत.
हे ही वाचा : शिवसेना नाशिकमध्ये एकहाती सत्ता स्थापित करेल; ‘या’ माजी मंत्र्याचा दावा
एमआयएमचे काही नगरसेवकदेखील त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावादेखील या क्लिपमध्ये करण्यात आला आहे. ही क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे खरंच डॉ. गफ्फार कादरी पक्ष सोडणार का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
दरम्यान या चर्चांबाबत या संदर्भात कादरी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. खोडसाळपणाने एक व्हिडीओ व्हायरल करत मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादीचे कुठलेही अस्तित्व शहरात व जिल्ह्यात नाही. त्यामुळे मी त्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही, असं गफ्फार कादरी म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“भाजप आणि ड्रग्ज पेडलर बद्दल बोलूया म्हणत, नवाब मलिकांनी शेअर केला अमृता फडणवीसांचा फोटो”
“उद्धव ठाकरेंचे हात बळकट करा अन् सगळीकडे शिवसेनेचा भगवा फडकवा”
न्यूझीलंडकडून भारताचा 8 विकेट्सने पराभव; सेमी-फायनलचा मार्ग झाला आणखी खडतर