Home नाशिक शिवसेना नाशिकमध्ये एकहाती सत्ता स्थापित करेल; ‘या’ माजी मंत्र्याचा दावा

शिवसेना नाशिकमध्ये एकहाती सत्ता स्थापित करेल; ‘या’ माजी मंत्र्याचा दावा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : आगामी निवडणुकांच्या पार्शभूमीवर सर्व राजकीय नेते कामाला लागले असून मोर्चेबांधणीलाही सुरुवात केली आहे.शिवसेनेनेही युद्ध पातळीवर तयारीला सुरुवात केली आहे. अशातच नाशिकमध्ये एकहाती सत्ता स्थापित करेल, असा दावा शिवसेना उपनेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केला. नाशिक रोड परिसरातील बूथप्रमुखांचे चार मेळावे पार पडले. यावेळी घोलप बोलत होते.

हे ही वाचा : “भाजप आणि ड्रग्ज पेडलर बद्दल बोलूया म्हणत, नवाब मलिकांनी शेअर केला अमृता फडणवीसांचा फोटो”

महानगरात शिवसेनेने सक्षम बूथ यंत्रणा उभारली असून यासंदर्भात बूथ प्रमुखांना महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. बूथप्रमुख हा पक्षाचा आत्मा असतो, हे लक्षात घ्या आणि येत्या महापालिका निवडणुकांत पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यास आपले सर्वस्व पणास लावा. नक्कीच शिवसेना नाशिकमध्ये एकहाती सत्ता स्थापित करेल, असं बबनराव घोलप यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेनेच्या बूथप्रमुखांचे काम कौतुकास्पद आहे. त्यांना आता आणखी जोमाने कामाला लागून जनसंपर्क वाढवावा लागेल. आपल्याला महापालिकेत परिवर्तन घडवायचे आहे. त्यामुळे जनतेच्या समस्या जाणून घ्या. जनतेचे आशीर्वादच पक्षासाठी मोलाचे राहतील हे लक्षात ठेवा, असेही घोलप म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी – 

“उद्धव ठाकरेंचे हात बळकट करा अन् सगळीकडे शिवसेनेचा भगवा फडकवा”

न्यूझीलंडकडून भारताचा 8 विकेट्सने पराभव; सेमी-फायनलचा मार्ग झाला आणखी खडतर

‘बापाच्या जीवावर राजकारणात असलेले सुप्रिया सुळेंसारखे फुटकळ नेते..’; अतुल भातखळकरांचं वादग्रस्त वक्तव्य