मुंबई : राज्यातली ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर भाजी खरेदीसाठी सकाळच्या बाजारात उसळणारी गर्दी बघितल्यानंतर ‘टाळाबंदी’चा उद्देशच धोक्यात आला आहे. जनतेनं घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणं सुरूच ठेवलं तर, सद्यस्थितीचा पुनर्विचार करून कठोर उपाय योजावे लागतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
राज्यातले बहुतांश नागरिक घरीच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहेत. मात्र, बेजबाबदारपणानं वागणाऱ्या मोजक्या व्यक्तींमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हे आता सहन केलं जाणार नाही. त्यामुळे अशा बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही, असा इशारा अजित पवारांनी यावेळी दिला आहे.
दरम्यान, राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण विभाग, पोलीस विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महसूल विभाग, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसंच शासनाची संपूर्ण यंत्रणा ‘कोरोना’विरोधात युद्धपातळीवर काम करत आहे, यांचं आभारही अजित पवारांनी मानलं केलं आहे.
राज्यातली ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर भाजी खरेदीसाठी सकाळच्या बाजारात उसळणारी गर्दी बघितल्यानंतर ‘टाळाबंदी’चा उद्देशच धोक्यात आला आहे. जनतेनं घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणं सुरूच ठेवलं तर, सद्यस्थितीचा पुनर्विचार करून कठोर उपाय योजावे लागतील.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 1, 2020
महत्वाच्या घडामोडी-
मरकजमधील व्यक्तींनी पुढे येऊन तपासणीसाठी सहकार्य करावं- उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या 335 वर; मुंबईत 14 रुग्ण तर बुलढाण्यात 1 रुग्ण
संजय राऊत म्हणजे पवारांच्या घरचे खरूजलेले कुत्रे; भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
पुढील वर्ष भराचा माझा पगार अन् CM फंडात जमा करा- जितेंद्र आव्हाड