मुंबई : महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या 335 वर पोहचली आहे. मुंबईत 14 रुग्ण तर बुलढाण्यात 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे रुग्णांचा आकडा 320 वरुन थेट 335 वर गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने या संदर्भातली माहिती दिली आहे.
करोनाशी लढा देता यावा म्हणून महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे तर देश लॉकडाउन करण्यात आला आहे. अशात रुग्णसंख्या चांगलीच वाढते आहे ही देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.
दरम्यान, देशातली करोनाग्रस्तांची संख्या 1600 च्या वर गेली आहे. यामधले सर्वाधिक 335 रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
संजय राऊत म्हणजे पवारांच्या घरचे खरूजलेले कुत्रे; भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
पुढील वर्ष भराचा माझा पगार अन् CM फंडात जमा करा- जितेंद्र आव्हाड
महाराष्ट्र उध्दवजींच्या सुरक्षित हातात आहे याचा अभिमान वाटतो- जितेंद्र आव्हाड
सांगलीत घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांचा दणका; केल्या तब्बल 350 वाहने जप्त