आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी कोरोनामुक्त झाले आहेत.
हे ही वाचा : वयोमर्यादा ओलांडलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट 2 वर्ष वाढीव संधी द्या; संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आज त्यांची चाचणी करण्यात आली असता चाचणीमध्ये ते कोरोनामुक्त असल्याचं निष्पन्न झालं आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्यासोबतच त्यांच्या मातोश्री कुंदाताई, बहीणदेखील कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. जलील परकार यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे मुंबई आणि पुण्यात कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करण्यात आले होते. मात्र राज यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर हे मेळावे पुढे ढकलण्यात आले होते.
महत्वाच्या घडामोडी –
बुलढाणात काँग्रेसचा भाजपाला धक्का! नगराध्यक्षांसह जिल्हा परिषद सदस्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ येणार एकाच व्यासपीठावर
राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; कोकणात असंख्य समर्थकांसह ‘या’ पक्षाचे चार बडे नेते राष्ट्रवादीत