आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचं राज्य सरकारकडून मान्य करण्यात आलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी कामगारांचा बेमुदत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा : नाशिकमध्ये राजकीय हलचालींना वेग; शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसेसह सर्व पक्षांमध्ये पक्षांतराचे प्रयोग जोरात
परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कामगार संघटनांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या महत्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, निर्णयानंतर 28 कोटी महागाई भत्ता आणि 2 कोटी घरभाडे असा 30 कोटी रुपयांचा भार एसटी महामंडळावर दरमहिना पडणार आहे. एसटी कामगारांच्या या दोन महत्वाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. मात्र, एसटीचं राज्य सरकारमधील विलिनीकरण करण्याच्या मागणीबाबत निर्णय घेण्यात आला नसल्याचं कळतंय.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेत प्रवेशाचा धडाका; बहुजन विकास आघाडीचे तीन नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?; क्रांती रेडकरचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
“राष्ट्रवादीत इनकमिंगचा धुमधडाका, ‘या’ पक्षातील नेत्यांनी हाती बांधलं घड्याळ”