आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापलं असून पक्षांतराच्या हालचालींना वेग आला आहे. सध्या येथील महापालिकेत एकूण 61 प्रभाग आणि 122 नगरसेवक, तर पाच स्वीकृत नगरसेवक आहेत. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापालिकेतील नगरसेवकांची संख्या आता 122 वरून थेट 133 करण्यात आली आहे.
हे ही वाचा : शिवसेनेत प्रवेशाचा धडाका; बहुजन विकास आघाडीचे तीन नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी अपक्ष नगरसेवक गुरुमितसिंग बग्गा पक्षाला राम राम ठोकत असून काँग्रेसमध्ये परतणार असल्याची माहिती आहे. तर अपक्ष नगरसेवक विमल पाटील आणि मुशीर सय्यदही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मेळाव्याला हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे ते लवकरच हाती शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत, तर तसेच या निवडणुकीसाठी मनसेनेही युद्धपातळीवर तयारी सुरू केली असून काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मैदानात उतरले आहे.
महत्वाच्या घडामोडी –
एका महिलेवरील खासगी हल्ले बाळासाहेबांना पटले असते का?; क्रांती रेडकरचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
“राष्ट्रवादीत इनकमिंगचा धुमधडाका, ‘या’ पक्षातील नेत्यांनी हाती बांधलं घड्याळ”
“मनसेचं मिशन विदर्भ; अकोला महापालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढणार”