मुंबई : क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात धडक कारवाई करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहे. मलिक हे सातत्याने समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करत आहेत. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
सध्या ट्विटवर गुन्हा दाखल करणारे मुख्यमंत्री आज उघडपणे एका महिलेची बदनामी होत असताना गप्प का आहेत? असा सवाल करत ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक हे एका महिलेची कौटुबीक विषयाबाबतची बदनामी करताना दिसत आहेत. ते काझी म्हणतायत की त्यांच्याजवळ असलेली कादगपत्रे खरी आहेत. त्याची शाहनिशा न्यायालयीन प्रक्रियेमधून होऊ शकते. परंतु अशा पद्धतीनं महिलेच्या वैयक्तिक आयुष्याचा माध्यमांसमोर बाजार मांडण्याचा अधिकार नबाव मलिक यांना कोणी दिला, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
हे ही वाचा : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण
दरम्यान, पुन्हा एकदा सिद्ध झाले की, ज्या काँग्रेसी प्रवृत्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा साम-दाम-दंड-भेद वापरून निवडणूकीत पराभव केला होता. ती काँग्रेसी प्रवृत्ती जेव्हा जेव्हा सत्तेवर येते तेंव्हा तेंव्हा दलित आणि शोषितांवर अन्यायच होतो, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलीक हे खुलेआम एका महिलेच्या कौटुंबिक विषयाबाबत सर्व माध्यमांपुढे नाहक बदनामी करातायेत.
साध्या ट्विटवर गुन्हा दाखल करणारे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आज उघडपणे एका महिलेची बदनामी होत असताना गप्प का आहेत? pic.twitter.com/nszWr7jA07
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 28, 2021
महत्वाच्या घडामोडी –
‘…तर नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा’; भाजपच्या ‘या’ नेत्यांची मागणी
समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक, त्यांना लाज वाटली पाहिजे- किरीट सोमय्या
“नवज्योत सिंग सिद्धूंना काही कळत नाही, ते जास्त बोलतात, पण त्यांना मेंदू नाही”